साने गुरूजी प्रार्थना

खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ।। धृ. ।। ३ वेळा
जगि जे हीन अति पतित
जगी जे दीन पद दलित
तया जाऊनी उठवावे, जगाला प्रेम
अर्पावे ।।१।।
जयांना कोणी ना जगती,
सदा जे अंतरी रडती
तया जाऊनी सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे ।।२।।
कुणा ना व्यर्थ शिणवावे,
कुणा ना व्यर्थ हिणवावे,
समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ।।३।।
प्रभुची लेकरे सारी
तयाला सर्व ही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ।।४।।
असे जे आपणापाशी
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतजी जावे, जगाला प्रेम अर्पावे ।।५।। ३ वेळा
खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ।। धृ.।।



|| पसायदान ||

आतां विश्वात्मकें देवें। येणे वाग्यज्ञे तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हे ।।
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो।
भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्येपाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणीजात ।।
वर्षत सकळ मंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ।।
चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव । पीयुषांचे ।।
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वा ही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनी तिन्ही लोकी ।
भजि जो आदी पुरूखी । अखंडीत ।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।।
येथ म्हणे श्रीविश्वेश्वराओ । हा होईल दान पसावो

संत ज्ञानेश्वर



महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)

Our Presence

प्रादेशिक विभाग मुंबई (जिल्हे- नवी मुंबई व इतर उपनगरे ) 

Know More

प्रादेशिक विभाग कोकण (जिल्हे- ठाणे / रत्नागिरी/सिंधुदुर्ग/रायगड/पालघर) 

Know More

 प्रादेशिक विभाग, पुणे (जिल्हे- पूणे / सातारा / सोलापूर)  

Know More

प्रादेशिक विभाग खानदेश (जिल्हे- जळगांव / धूळे/नंदूरबार) 

Know More

५. प्रादेशिक विभाग, उत्तर मराठवाडा (जिल्हे- औरंगाबाद / जालना / नांदेड / हिंगोली)  

प्रादेशिक विभाग, दक्षिण मराठवाडा (जिल्हे लातूर / उस्मानाबाद / बीड / परभणी)  

Know More

 

प्रादेशिक विभाग, पश्चिम विदर्भ जिल्हे अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम

Know More

प्रादेशिक विभाग,पूर्व विदर्भ (जिल्हे नागपूर / भंडारा / वर्धा)  

Know More

प्रादेशिक विभाग, वनवैभव (जिल्हे- चंद्रपूर / गडचिरोली / गोंदिया) 

Know More

प्रादेशिक विभाग, नाशिक (जिल्हा- नाशिक)  

Know More

प्रादेशिक विभाग, अहिल्यानगर (जिल्हा- अहिल्यानगर)  

Know More

प्रादेशिक विभाग, बुलढाणा (जिल्हा- बुलढाणा)

Know More

प्रादेशिक विभाग, कोल्हापूर (जिल्हा कोल्हापूर)  

Know More

प्रादेशिक विभाग, सांगली (जिल्हा सांगली)  

Know More



काहीअविस्मरणीय क्षण…



LATEST NEWS & UPDATES

श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ नारायणगाव वारुळवाडी तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले.

नारायणगाव दिनांक १४ श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ नारायणगाव वारुळवाडी तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम…

Read More

“अण्णासाहेब टेकाळे यांनी केलेल्या आव्हानानुसार शंभरी गाठलेल्या ज्येष्ठांचा सन्मान”

फेसकामचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी केलेल्या आव्हानानुसार शंभरी गाठलेल्या ज्येष्ठांचा सन्मान करावा त्यानुसार दक्षिण मराठवाडा…

Read More

१०७ वय असलेल्या श्रीमती राधाबाई यांचा फेस्कॉम तर्फे सत्कार.

गुरूवार दिनांक ०७/११/२०२४पश्र्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग, अकोला – अमरावतीफेस्काॅम ने आव्हान केल्या प्रमाणे जसे आम्ही…

Read More